ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 43 हजार 836 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 6 लाख 89 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 2 लाख 55 हजार 699 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5601 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1.80 लाख बाधितांपैकी 1 कोटी 13 लाख 41 हजार 930 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 60 लाख 12 हजार 719 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 65 हजार 776 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 47 लाख 64 हजार 588 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 23 लाख 63 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 57 हजार 905 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 27 लाख 08 हजार 876 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 18 लाख 84 हजार 051 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 93 हजार 616 जणांचा मृत्यू झाला आहे.