छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बस्तर सीमेवर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या तळावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याने जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर अनेक नक्षलवाद्यांनी पळ काढला. तर सुरक्षा दलांनी 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे.









