वृत्तसंस्था/ चेन्नई
आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी माजी विजेत्या चेन्नई सिटी एफसी संघाच्या नव्या प्रमुख प्रशिक्षकपदी सत्यसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चेन्नई सिटी एफसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी ही घोषणा गुरूवारी केली. सत्यसागर हे यापूर्वी चेन्नई सिटी एफसी संघाचे साहाय्यक प्रशिक्षक होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये चेन्नई सिटी एफसी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सिंगापूरचे अकबर नेवास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद भरणे आवश्यक होते. तामिळनाडूच्या सत्यसागर यांना जवळपास 26 वर्षांचा फुटबॉल प्रशिक्षणाचा अनुभव आहे. गेली दोन वर्षे ते चेन्नई सिटी एफसी संघाबरोबर कार्यरत होते. पुढील वर्षीच्या 9 जानेवारीपासून 2020-21 च्या आय लीग फुटबॉल हंगामाला प्रारंभ होणार असून चेन्नई एफसीचा सलामीचा सामना गोकुळाम केरळ संघाबरोबर होणार आहे.









