► प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर विभागाचे जीएसटी सहआयुक्त एम. जे. राणेशबाबू यांची भेट घेतली. उद्योजक, व्यापारी, सुवर्णकार यांनी एकत्रीतरित्या जीएसटी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. टेस्ट पर्चेजर्स, एन्क्वायरी व चेक्स ऑफ स्टॉक्स या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सहआयुक्त राणेशबाबू म्हणाले, कोणत्याही उद्योजक अथवा व्यापाऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे सांगत त्यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, सेव्रेटरी स्वप्नील शहा, विजय दरगशेट्टी, दिलीप तिळवे, रोहन जुवळी, रोहित कपाडिया, अनिल कुंडप, सुनिल नाईक, मुकेश खोडा यासह इतर सदस्य उपस्थित होते.









