वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनचा हलगर्जीपणा किंवा कारस्थानामुळे जग कोरोनाच्या खाईत लोटले गेले आहे. भारतालाही याचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम भारतात जोर पकडत आहे. मात्र, बजाज दुचाकी निर्मिती कंपनी आणि मारूती सुझुकीने या मोहीमेला विरोध केला आहे. चीनमधून सुटे भाग आयात करावे लागतात त्यामुळे अशी मोहीम चालवू नये असे या दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे. सरकारने आयात वस्तूंवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही या कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे. सरकारची धारणे व्यवसाय अनुकूलतेच्या धोरणाशी सुसंगत नाहीत असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र जनमताच्या रेटय़ासमोर या दोन कंपन्यांना त्यांचा विरोध कितपत ताणता येईल यावर तज्ञ साशंकता व्यक्त करीत आहेत.









