तैपैई
चीन आणि तैवान यांच्यादरम्यान दीर्घकाळापासून तणाव सुरू आहे. मागील महिन्यात दोन्ही देशांच्या मुत्सद्दय़ांदरम्यान फिजीमध्ये झटापट झाल्यावर हा तणाव अधिकच वाढला आहे. चिनी सैन्य कुठल्याही क्षणी हल्ला करू शकते, अशी शंका तैवानला सतावू लागली आहे. याचमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तैवानने किनमेन बेटाच्या समुद्र किनाऱयांवर अँटी लँडिंग स्पाइक (लोखंडी टोकदार सळय़ा) बसविल्या आहेत. चिनी सैन्य सागरी मार्गाने तेथे पोहोचू नये याकरता हे पाऊल उचलण्यात आले आहे. याचबरोबर या स्पाइक्सपासून काही अंतरावर रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. अँटी लँडिंग स्पाईक्स समुद्रात दीर्घ अंतरावरुनही दिसून येतात. परंतु तैवानच्या लोकांमध्ये समुद्र किनाऱयावर एखादे स्मारक तयार केले जात असल्याचा विरोधाभास निर्माण झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान संघर्ष सुरू होण्याचा धोका कायम राहतो, यात तैवानचा सहकारी म्हणून अमेरिकेलाही सामील व्हावे लागू शकते.









