ऑनलाईन टीम / बिजींग :
कोरोना या जीवघेण्या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 2442 जणांचा बळी घेतला आहे. तर या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 77 हजारांवर पोहचली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
चीनमधील 31 प्रांतात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता 76 हजार 936 वर पोहचली आहे. शनिवारी चीनमध्ये कोरोनामुळे 97 लोकांचा मृत्यू झाला. तर नवीन 648 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. 22 हजार 888 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
चीनमध्ये रुग्णालयांची संख्या अपुरी असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आतंरराष्ट्रीय तज्ञांचे 15 जणांचे पथक चीनमध्ये मदतकार्य करत आहे.
चीनसह इतर 25 देशात या विषाणूचा संसर्ग झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर जपानमध्ये 751, दक्षिण कोरिया-556, इटलीत-51, मलेशिया-22, हाँगकाँग-70, सिंगापूर-89, थायलंड-34, तैवान- 18, व्हिएतनाम-16, फ्रान्स 12, जर्मनी-16 तर अमेरिकेत 35 जण कोरोनाचे रुग्ण आहेत.









