ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या लसीला ‘कॅनसिनो बायोलॉजिक्स इंक’ असे पेटंट मिळाले आहे. कॅनसिनो कंपनीने Ad5-nCOV नावाने लस तयार केली आहे.
कोरोनावरील लसीचे पेटंट मिळवणारी कॅनसिनो ही पहिली चिनी कंपनी आहे. चीनच्या नॅशनल इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अॅडमिनिस्ट्रेशनने 11 ऑगस्टलाच या पेटंटला मंजुरी दिली होती. कॅनसिनो आता लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करणार आहे.
कॅनसिनो कंपनीची लस कँडिडेट कॉम कोल्ड व्हायरसमध्ये बदल करून तयार केली आहे. याच पद्धतीने ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस देखील तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दोन चाचण्यांदरम्यान या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. तसेच ही लस अँटीबॉडी, टी सेल तयार करण्यास सक्षम होती. कॅनसिनो आता रशिया, ब्राझील आणि चिलीमध्ये देखील तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू करणार असल्याचे सांगण्यात येेते.









