चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकास मास्क वापरणे अनिवार्य केले असल्याने स्वत:च्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकजण मास्क वापरत आहे. असे असताना सध्याच्या पॅशनच्या युगात शहरातील बाजारपेठेत दाखल झालेल्या विविध प्रकारच्या आकर्षक पावसाळी व कार्टून मास्कनी नागरिकांना भुरळ घातली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरुन गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. शिवाय मास्क न वापरणाऱयावर दंडात्मक कारवाईही केली जात असल्याने वृध्दापासून ते अगदी बच्चेकंपनीपर्यंत सर्वजण मास्क वापरत आहेत. यातूनच कोरोनाविरुध्दच्या लढय़ासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त आत्मसात केली आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅन्सी मास्क वापरण्याची प्रेझ निर्माण झाली आहे. तरुणाईमध्ये ही क्रेझ ठळकपणे दिसून येत आहे.
या पॅन्सी मास्कवर कार्टून, स्माईल, छोटाभीम, मोटू पतलू, टॉम ऍण्ड जेरी अशा स्वरुपातील कार्टूनची छपाई केली आहे. यामुळे ते लक्षवेधी ठरत आहेत. शहरातील बाजारपेठेतील बहुतांशी कापड विक्रेत्यांपासून छोटय़ा स्टॉलधारकांनी अशा स्वरुपाचे मास्क विक्रीसाठी ठेवले असून अशा पॅन्सी मास्कनी बाजारपेठ सजली आहे. या मास्कचा अधिक खप असल्याने व्यावसायिकांनी असे पॅन्सी मास्क दुकानासमोर टांगून ठेवले आहेत.
ड्रेसप्रमाणे मॅचिंग मास्क
आपल्या वेगळेपणासाठी काहीनी आपल्या ड्रेसवर मॅचिंग मास्कही खरेदी केले आहेत. यात साध्या मास्कप्रमाणे पॅन्सी मास्कचा समावेश आहे. पावसाळय़ात कापडी मास्क भिजत असल्याने ते वापरणे कठीण होऊन बसले आहे. शिवाय पावसामुळे भिजलेल्या कापडी मास्कमुळे श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून बाजारपेठेत दाखल झालेले उपयुक्त असे पावसाळी फिल्टर मास्क अनेकांनी वापरणे सुरु केले आहे. शिवाय पावसात भिजल्यानंतर या मास्कवर कोणताच परिणाम होत नसल्याने ते फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे या मास्कना मागणी वाढली आहे. शहरातील भाजी मंडई परिसरातील दुकानात असे मास्क उपलब्ध असून सध्यस्थितीत त्याची 90 रुपये दराने विक्री केली जात आहे.
मास्कचे वेगळेपण: रोहन चौधरी
पावसाळी प्लास्टीकचे मास्क हे 70 गॅम वजनाचे असून त्याला 2 फिल्टर आहेत. त्यातच हे मास्क पावसाळी असल्याने ते किताही भिजले तरी त्यावर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांमधून यास अधिक मागणी असल्याची माहिती व्यावसायिक रोहन चौधरी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









