वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड महामारी आणि लॉकडाऊनच्या कारणामुळे देशाचे सरासरी सकल उत्पादन (जीडीपी) 2020 मध्ये 3.1 टक्क्मयांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज यांनी व्यक्त केला आहे. एजन्सीच्या माहितीनुसार वर्ष 2021 मध्ये देशाचा जीडीपी 6.9 टक्क्मयांनी वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
चालू वर्षातील दुसऱया तिमाहीत (एप्रिल-जून) हा जीडीपी दर दुसऱया महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेतला सर्वात खराब तिमाही राहणार असल्याचे मूडीजने ग्लोबल मॅक्रो आउटलूक अहवालात सांगितले आहे. चालू वर्षाच्या दुसऱया सहामाहीच्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मात्र जी-20 समुहातील चीन हा एकमेव देश असा असेल जो चालू वर्षात विकास नोंदवणार असल्याचे मूडीजने स्पष्ट केले आहे.









