प्रतिनिधी / शिरोळ
मौजे आगर तालुका शिरोळ येथील महिला हौसाबाई मारुती पाटील 65 यांना रस्त्यावरचाकूचा धाक दाखवून दोन अज्ञात इसमाने त्यांच्या अंगावरील एक तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मौजे आगर धरणगुत्ती रस्त्यावर रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतची नोंद रात्री उशिरा शिरूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की हौसाबाई पाटील या लंगरे मळ्यातून धरणगुत्तीकडे पायी जात असताना मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम आले त्यांनी या वृद्ध महिलेचा चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कानातील कानातील तीन ग्रॅमचे कर्णफुले पाच ग्रॅमचे गळ्यातील मंगळसूत्र तीन ग्रॅम च्या बुगड्या असा ग्रॅमचा ऐवज व रोख सातशे रुपये असाच तीस हजार 700 रुपये चा ऐवज लंपास केला आहे. प्राथमिक तपास फौजदार माने हे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









