सेना-भाजप युतीचे नेत्यांची विकास महामंडळाच्या कामात भागीदारी
सावंतवाडी / प्रतिनिधी:
चांदा ते बांदा योजना तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या जिल्ह्यात राबवली खरी व ती योजना चांगली होती. पण प्रत्यक्षात ही योजना राबवण्यास पूर्णपणे केसरकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जे विकास कामे झाली ती अपूर्ण असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. अशी आता ओरड भाजप चे नेते करत आहेत. खरतर त्यावेळेस सेना-भाजप युतीची सत्ता होती, मग त्यावेळी हे भाजपचे नेते गप्प का होते. असा सवाल मनसेने चे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सावंतवाडी शहरात पर्यटन विकास महामंडळाच्या मधून जो घोटाळा झाला आहे. त्यामागे सेना-भाजपचे दोन्ही नेते पदाधिकारी जबाबदार आहेत. या संदर्भात आपण जन आंदोलन उभारून ही कामे व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे ते म्हणाले यावेळी मनसेचे पदाधिकारी आशिष सुभेदार उपस्थित होते.