क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत आज जेतेपद मिळविण्याच्या यत्नात गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबचा सामना पंजाब एफसीशी होणार आहे. हा सामना सायंकाळी 5 वाजता विवेकानंद युवाभारती स्टेडियमवर होईल.
गोकुळम केरळ, ट्राव आणि चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब यांच्यात जेतेपदासाठी जबरदस्त चुरस आहे. आज ट्राव आणि गोकुळम केरळ यांचाही निर्णायक सामना आहे. गोकुळम, ट्राव आणि चर्चिल ब्रदर्सचे प्रत्येकी 26 गुण आहेत. ट्राव आणि गोकुळम यांच्यातील लढत अनिर्णीत राहिली आणि चर्चिल ब्रदर्स क्लबने पंजाब एफसीवर विजय मिळविला तर चर्चिलला 29 गुणांनी आय-लीगचे जेतेपद तिसऱयांदा मिळू शकते.
आम्हाला ट्राव आणि गोकुळम लढतीचे पडून गेलेले नाही, मात्र बरोबरी व्हावी याची अपेक्षा आम्ही करतो. आम्हाला पंजाब एफसी विरूद्ध विजय नोंदवायचायं, असे चर्चिल ब्रदर्स क्लबचे प्रशिक्षक फर्नांडो वारेला म्हणाले. चषकासाठी निकाल काहीही लागो, मात्र आमच्यासाठी यंदाचा आय-लीगचा सीझन चांगला गेला असल्याचे वारेला म्हणाले. आम्ही आय-लीगमध्ये उत्कृष्ट संघ आहे. आम्ही चांगले खेळलो तसेच एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी केल्याचे वारेला म्हणाले. पंजाब एफसी हा एक चांगला संघ आहे व यात चांगल्या विदेशी आणि भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.









