चाळीस हजार रुपयांचा चरस जप्त : पेडणे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /पेडणे
अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी मूळ नेपाळ येथील नागरिकाला बुधवारी दि. 22 रोजी अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला. पेडणे पोलिसांनी ही कारवाई केली.
पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालचावाडा हरमल येथे पॅरिड कॅबिन रेस्टॉरंटमध्ये आणि हॉटेल येथे अमली पदार्थाचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वतः निरीक्षक जीवबा दळवी यांनी उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर, विष्णू गाड, भास्कर च्यारी यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत 40 हजार रुपयांचा चरस सापडले. मूळ टेकापूर नेपाळ येथील नागरिकत्व असलेला भीम बालबहाद्दूर साऊड याला घटनास्थळावर ताब्यात घेतले व त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करत अटक केली. पुढील तपास उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व उत्तर गोवा अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी करत आहेत.









