ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील बँकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची माहिती सादर केली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जबुडव्यांविरोधात पीएमएलएच्या अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहिती मेहता यांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माल्या, मोदी आणि चोक्सीच्या संपत्तीच्या विक्रीद्वारे 13109 कोटी रुपये मिळविल्याची माहिती दिली होती. बँकांनी अलीकडच्या रिकव्हरीत 792 कोटी रुपये वसूल केले आहेत.