जिल्हा पंचायतीसमोर धरणे : विविध मागण्यांचे निवेदन सादर
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱया वॉटरमन आणि स्वच्छता कर्मचाऱयांना नोकरीत कायम करण्याची मागणी करत कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा पंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांनी सदर मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आंदोलकांना दिली.
निवेदनात ग्रा. पं. कर्मचाऱयांना ऑनलाईन पद्धतीने वेतन अदा करण्याचे आदेश मागील महिन्यात देण्यात आले आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी पंचायत विकास अधिकारी करीत नाहीत. कार्यरत कर्मचाऱयांच्या निधनानंतर अनुकंपा धोरणाआधारे सदर कर्मचाऱयांच्या वारसाला नोकरीत घ्यावे, तसेच इतर सोयीöसवलती द्याव्यात. सरकारने याबाबत आदेश जारी केले असले तरी पंचायतीकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे यावेळी संघटनेचे अध्यक्ष व्ही. पी. कुलकर्णी यांनी सांगितले.
सरकारच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जि. पं. कार्यालयासमोर शेकडो कर्मचाऱयांनी धरणे धरले होते. यावेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी पाठपुरावा करून मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.









