प्रतिनिधी / पणजी
कॉलेज ऑफ आर्टस या शैक्षणिक संस्थेसाठी जीपीएसीने प्राचार्यासारख्या महत्वाच्या पदावर नियुक्त करण्यासाठी पात्र गोमंतकीय उमेदवारास डावलून बिरगगोमंतकीय महिलेची निवड करण्यात आली आहे. ही भरती आरआरप्रमाणे न करता बेकायदेशीररित्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर न्याय केला आहे. परंतु जीपीएसीने गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाला म्हणजे मी शिवाजी शेटला डावलून एका बिगरगोमंतकीय महिलेला प्राचार्यपदी भरती करून अन्याय केला आहे. ही भरतीसुद्धा सरकारला अंधारात ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने या घोटाळय़ाची दखल घेऊन जीपीएसीच्या प्रत्येक अधिकाऱयाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलांच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
जीपीएससीने एप्रिल 2020 मध्ये प्राचार्यपदासाठी पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यावेळीही आपण अर्ज केला व मुलाखतीसाठी हजर झालो. केवळ दोनच उमेदवार होते. मात्र आपणाला डावलून बिगर गोमंतकीय उमेदवाराची निवड करण्यात आली. बिगर गोमंतकीय असलेल्या महिला उमेदवाराकडे गोव्यात 15 वर्षे वास्तव्याचा दाखला नाही. तसेच तिला कोकणीचेही ज्ञान नाही. तरीही सदर महिलेची निवड करण्यात आली. यात जीपीएससीने घोटाळा करून नियुक्ती केली आहे. यासाठी जीपीएसीने संचालक, भरती व निवड समिती व इतर पदाधिकारी जबाबदार आहे. सरकारने यात लक्ष घालावे. दोन उमेदवार असताना एकाच उमेदवाराची माहिती सरकारला अंधकारात ठेवून पाठविण्यात आली. जीपीएसीचे संचालक नोरोन्हा यांनी या घोटाळा केला आहे. भरती प्रक्रियेत जीपीएसी गौडबंगाल करत आहेत. या खात्यातील सर्व अधिकाऱयांची चौकशी करावी आणि या घोटाळय़ाची दखल घेऊन त्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ. शिवाजी शेट यांनी केली.









