डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातील गोवा फॉरवर्ड व काँग्रेस युतीचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांच्या प्रचारार्थ कळंगुटचे माजी आमदार मायकल लोबो मैदानात उतरले असुन मायकल लोबो यांनी मतदारसंघाच्या चोडण भागात घरोघरी फिरून प्रचार केला. यावेळी त्यांच्या समवेत उमेदवार संतोषकुमार सावंत, संघटनमंत्री दुर्गादास कामत, श्रीकृष्ण हळदणकर व इतरांची उपस्थिती होती.
राज्यात आज भाजप पक्षाला पूर्णपणे खाली खेचणे काळाची आणि राज्या हिताची गरज बनली आहे. या मोहिमेत लोकांनी सहभागी होताना काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मायकल लोबो यांनी केले.









