चॅडविक बोसमॅन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता – द क्राउन सीरिजला 4 पुरस्कार
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा 78 वा सोहळा 28 फेब्रुवारी रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 मार्च सकाळी 6.30 वाजता) पार पडला आहे. कोरोना महामारीमुळे यंदा या पुरस्कारांची घोषणा ऑनलाइŸन स्वरुपात करण्यात आली आहे. दिवंगत चॅडविक बोसमॅनला मोशन पिक्चरच्या ड्रामा शेणीत ‘मा रैनीज ब्लॅक बॉटम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. टीव्हीच्या ड्रामा शेणीत ‘द क्राउन’ने सर्वोत्कृष्ट सीरिज, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2021 ची नामांकने 3 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आली होती. यंदाच्या पुरस्कार सोहळय़ांमध्ये 2020 चे पूर्ण वर्ष आणि 2021 च्या प्रारंभी प्रदर्शित झालेले चित्रपट तसेच टीव्ही सीरिजचा सन्मान करण्यात आला. चित्रपटांच्या शेणीत डेव्हिड फिन्चर यांच्या ‘मांक’ या चित्रपटाने सर्वाधिक 6 नामाकंने मिळविली होती. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्रीसाठीचे नामांकन सामील होते. एरोन सोर्किन यांच्या ‘द ट्रायल ऑफ द शिकागो 7’ला 5 शेणींमध्ये नामांकने मिळाली होती.
टीव्हीच्या ड्रामा सीरिजमध्ये नेटफ्लिक्सच्या ‘द क्राउन’ला सर्वोत्तम सीरिज, सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्रीसह 6 नामांकने प्राप्त झाली होती. तर ‘स्चिट्स क्रीक’ला सांगितिक/विनादी सीरिजमध्ये 5 नामांकने मिळाली होती.

शेणी विजेता
सर्वोत्तम मोशन पिक्चर (विदेशी भाषा) मीनारी (युएसए)
सर्वोत्तम टीव्ही सीरीज (सांगितिक/विनोदी) शिट्स क्रीक
सर्वोत्तम टीव्ही सीरिज (ड्रामा)…… द क्राउन
सर्वोत्तम टीव्ही अभिनेता (ड्रामा)… जोश ओ कॉनर (द क्राउन)
सर्वोत्तम टीव्ही अभिनेत्री (ड्रामा)… एमा कोरिन (द क्राउन)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री………. गिल्लन अँडरसन (द क्राउन)
सर्वोत्तम अभिनेत्री (सांगितिक/विनोदी) कॅथरीन ओ हारा (शिट्स क्रीक)
सर्वोत्तम अभिनेत्री (मोशन पिक्चर) रोजमुंड पाइक (आय केअर अ लॉट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (ड्रामा)…………. नोमाडलँड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट)……… क्लोए झाओ (नोमाडलँड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (चित्रपट)…….. चॅडविमक बोसमॅन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट)…….. एंड्रा डे
सर्वोत्कृष्ट लिमिटेड सीरिज द क्वीन्स गॅम्बिट









