मुंबईः
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजला घर विक्रीमध्ये सध्याच्या चालू तिमाहीत दमदार वाढ होण्याची आशा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी-मार्च या तिमाहीत विक्री 2 हजार 600 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नोंदली जाईल. अलीकडच्या काळात कंपनीने 10 नवे प्रकल्प उभारले असून घरांच्या मागणीप्रती वाढलेला कल पाहता वरील उद्दिष्ट साध्य केले जाणे शक्य असल्याचे कार्यकारी अध्यक्ष पीरोजशा गोदरेज यांनी म्हटले आहे.









