नवी दिल्ली
डॉ. एस. पद्मावती यांचे वयाच्या 103 व्या वर्षी कोविड-19 संक्रमणामुळे निधन झाले आहे. म्यानमारमध्ये जन्मलेल्या पद्मावती यांनी रंगून वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. डॉ. पद्मावती यांनी भारतातील पहिल्या कार्डियक केयर युनिटच्या स्थापनेचे श्रेय दिले जाते. त्यांनीच 1981 मध्ये नॅशनल हार्ट इन्स्टीटय़ूटची स्थापना केली होती.
पद्मावती यांना कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. श्वसनावेळी त्यांना त्रास जाणवत होता आणि त्यांना ज्वरही आला होता. न्युमोनियाचा प्रभाव त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांवर पडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू ओढवला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाप्रित्यर्थ डॉ. पद्मावती यांनी भारत सरकारने 1967 मध्ये पद्मभूषणने गौरविले होते. तर 1992 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला होता. डॉ. पद्मावती यांना हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल पुरस्कारासह डॉ. बीसी रॉय आणि कमला मेनन संशोधन पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.









