बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना गेल्या ६ महिन्यांत दोन कोटींपेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या आणि एकूण १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे देश ४५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे असे म्हंटले आहे.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी निराश झालेल्या बेरोजगार तरुणांनी हा दिवस # राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी या संकटामुळे आमच्या तरूणांचे मौल्यवान वर्ष वाया जाणार असून यापुढे अनेक समस्या उद्भवणार असल्याचे म्हंटले आहे.









