कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार्यांनी पुन्हा एकदा गुळाचे सौदे बंद पाडले आहेत त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद झाला असून बाजार समितीमधील तणावपूर्ण वातावरण आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच बाजार समितीत गुळाच्या वजनावरून वाद सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे बाजार समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मध्यस्थी करून बॉक्सच्या वजनावर तोडगा काढला होता पण आठच दिवसात हा निर्णय अमान्य असल्याचे सांगत सोमवारी सकाळी व्यापाऱ्यांनी सौदी काढणे बंद केले. त्यामुळे बाजार समितीत सुमारे दोनशे ते अडीचशे गुळाच्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेलया आहेत.









