ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
गूगलने चीनशी संबंधित 2500 यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. मात्र, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक करत 2500 हून अधिक चॅनेल डिलिट केले आहेत.
चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला या व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्याची खातरजमा करून गूगलने एप्रिल ते जून या तिमाहीत हे यूट्यूब चॅनेल हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे.









