डा.प्रमोद सावंत अनेक मंञ्याकडून आणि मान्यवरां कडून अभिनंदन
प्रतिनिधी /पेडणे
नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक गुणाजी मांदेकर यांना भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील केवळ सात युवक-युवतींना प्रति÷sच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे व त्यामध्ये गोव्याच्या गुणाजी मांदेकर यांचा समावेश आहे. उल्लेखनीय व भरीव कार्य करणाऱया देशभरातील युवकांमधून निवड केली जाते. गुणाजी मांदेकर हे नेहरू युवा केंद्राचे सक्रिय स्वयंसेवक आहेत. तसेच विद्यार्थी दशेतही त्यांनी सेंट जेव्हियर कॉलेज, म्हापसा व गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळावर प्रतिनिधित्व केलेले आहे. रक्तदान शिबीर तपासणी शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण द्वारे वन महोत्सव स्वच्छ भारत अभियान नशा मुक्त भारत अभियान व इतर मुद्यावर आधारित जनजागृती अभियान, व्यक्तीमहत्त्व व नेतृत्व शिबीर, आंतरराज्य युवा आदान-प्रदान राष्ट्रीय एकता शिबिर अशा विविध कार्यक्रमाद्वारे युवा विकासाचे कार्य गुणाजी मांजरेकर यांनी केले आहे.
ड़ गुणाजी मांदेकर कार्याची दखल घेऊन नेहरू युवा केंद्राने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेवक म्हणून यांचा सत्कार केला होता. नासिक महाराष्ट्राच्या भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेवा रत्न पुरस्काराने गुणाजी यांचा गौरव करण्यात आला होता तसेच गोवा राज्याच्या शासनाच्या समाजकल्याण खात्यातर्फे उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने गोवा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते गुणाजी मांदेकर यांना सन्मानित केले होते.
गुणाजी मांदेकर यांना सदर प्रति÷sचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे क्रीडा मंत्री मनोहर बाबू आजगावकर ,राज्याचे कला सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ,माजी आमदार किरण कांदोळकर, माजी मंत्री दयानंद मांदेकर समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्याचे फेसबुक ट्विटर व्हाट्सएप इंस्टाग्राम व इतर सामाजिक माध्यमाद्वारे अभिनंदन केले आहे.









