प्रतिनिधी / सातारा
पाटण तालुक्यातील मोरगिरी येथील श्री सिध्देश्वर मंदिर परिसरात असलेल्या विरगळीचे संवर्धन टीम गुणवंतगडच्या मावळ्यांनी केले. गुरुवारी ही मोहीम राबवली. वीराला युध्दात वीरमरण येणे हे मोठे पुण्याची गोष्ट समजली जायची व त्याचे स्मरण रहावे म्हणून वीरांची स्मारके गावोगावी उभारली गेली.
म्हणून या वीरांच्या स्मारकातून पुढच्या पिढीने प्रेरणा घ्यावी व वेळप्रसंगी पुर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून गावच्या रक्षणार्थ मोठ्या धैर्याने शत्रूशी युध्द करतील हाच हेतू अशा वीरगळ स्मारके महाराष्ट्रात गावोगावी बघायला मिळतात. याच प्रेरणेने टीम गुणवंतगड व स्थानिकांच्या सहकार्यातून किल्ले मोरगिरी गावातील सिध्देश्वर मंदिराच्या परिसरातील वीरगळ जतन व संवर्धन करण्याचे काम एक वर्ष झाली करत आहे. राबवण्यात आलेल्या मोहिमेत वीरगळच्या आजूबाजूचे वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली, अशी माहिती सागर कदम यांनी दिली.
Previous Articleसौदी अरेबियाचाही चीनला दणका; रद्द केला 10 अरब डॉलरचा करार
Next Article सातारा जिल्ह्यात 342 कोरोना बाधित तर 10 मृत्यू









