मुंबई : प्रारंभीच्या जवळपास 10 वर्षांपर्यंत गुंतवणूकदारांची उपेक्षा झेलणाऱया एक्सचेंज टेडेड म्हणजे ईटीएफमधील गुंतवणूकदारांची रुची आता तेजीने वाढत जात असल्याची माहिती आहे. परंतु मागील 10 वर्षामध्ये देशाचा ईटीएफ व्यवसाय 200 पटीने अधिक वाढला असल्याचे दिसून आलेले आहे. वर्ष 2010 मध्ये ईटीएफचे एकूण एयूएम (गुंतवणूक बाजारमूल्य) 957 कोटी रुपये होते. जे 2020 मध्ये दोन लाख सहा हजार कोटीपेक्षा अधिक राहिले आहे.
देशामधील ईटीएफचा प्रारंभ डिसेंबर 2001 मध्ये झाला होता. परंतु यातील वेगात काही प्रमाणात सुस्ती राहिली आहे. पहिल्या आठ वर्षात ईटीएफमध्ये एकूण मिळून एक हजार कोटी रुपयांचीसुद्धा गुंतवणूक झाली नव्हती. 2010 च्या नंतर मात्र ईटीएफमधील गंतुवणूकदारांचा कल वाढत जात 2015 च्या नंतर ईटीएफमध्ये तेजी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरच्या तेजीसोबत आता ईटीएफमधील एकूण म्युच्युअल फंडच्या व्यवहारामधील हिस्सेदारी मात्र 7.52 टक्के आहे. जी अमेरिकेसह अन्य बाजारांच्या तुलनेत काहीशी कमी असल्याची माहिती आहे.









