शिरोळ/ प्रतिनिधी
कोरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी, सीमा बंदी व गाव बंदी असतानाही इचलकरंजी येथील परप्रांतीय कामगार उत्तर प्रदेशमधील इलाहाबाद कडे जात असताना शिरोळ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज पहाटे ताब्यात घेतले. यांनतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून इचलकरंजी जवाहरनगर येथे पुन्हा पाठविण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी की आज बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर इचलकरंजी येथील परप्रांतीय कामगार अशोक सिंह रजपुत वय वर्ष 22 पंकज सिंग राजपूत (वय वर्ष 20), आशिष कुमार सिंग ((वय वर्ष22 ), प्रकाश सिंग रजपूत ((वय वर्ष19), देवेंद्रसिंग रजपुत (वय वर्ष(16), सौरभ सिंह रजपुत सर्व राहणार इलाहाबाद सध्या जवाहरनगर इचलकरंजी येथे राहतात. काम नसल्याने ते इलाहाबाद उत्तर प्रदेश या आपल्या मूळ गावी रात्री एक वाजता पायी जात होते. शिरोळ नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नगरसेविका करुणा कांबळे यांचे पती जनार्दन कांबळे यांनाही माहिती मिळाली त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने या तरुणांना ताब्यात घेतले व पोलिसांना पाचारण केले या परप्रांतीय तरुणांची माहिती घेऊन इचलकरंजी येथील आशिष बोहरा यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. या सर्व तरुणांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले








