मुंबई
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ही कोरोना संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र वयोमानानुसार त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याची माहिती त्यांच्या पुतणी रचना यांनी वफत्त संस्थेला सांगितले. त्यांना ब्रिजकँडी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. लता मंगेशकर यांना कोविडची सौम्य लक्षणे असून वयोमानानुसार असलेल्या समस्यांमुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात येत आहेत. यापूर्वी 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच मी डॉक्टरांना भेटूनही विचारपूस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









