पेडणे / ( प्रतिनिधी )
रुपये 10 हजाराचा गांजा बाळगल्या प्रकरणी पेडणे पोलिसांनी मधलावाडा हरमल येथे रशियन नागरिक वशाली स्पाक (39) याला अटक केली .निरीक्षक दळवी यांनी अमलीपदार्थ विरोधी कडक मोहीम उघडलेली आहे .
पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी माहिती देताना 10 रोजी एक संशयित रशियन नागरिक गांजा घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळताच दुपारी 3.15 वाजता निरीक्षक दळवी यांच्या नेतृत्वाआखाली उपनिरीक्षक संजीत कानोळकर ,उपनिरीक्ष हरीश वायंगणकार , का?न्स्ट?बल विनोद पेडणेकर ,अनिशकुमार पोके ,रवी म्हाळोजी ,भास्कर च्यारी , प्रवीण महाले व स्मिता गावस या टीमने धाड घालून संशयिताला शिताफीने पकडले . संशयित च्या विरोधात पोलिसांनी अमली प्रदार्थ गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली .









