प्रतिनिधी /बेळगाव
मंदिर खुले झाले आणि मंदिरासमोरील पूजासाहित्याचे बाजारही फुलले. कोरोनाच्या दुष्टचक्राने हातावर पोट असणाऱया अनेक छोटय़ा विपेत्यांच्या प्रचंड हालअपेष्टा झाल्या. त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते आणि पर्यायी रोजगारही मिळत नव्हता. यापैकीच एक घटक म्हणजे मंदिरासमोर असणारे पूजा साहित्य विपेते.
मंदिर खुले होणार, अशी घोषणा शासनाने करताच या सर्व विपेत्यांनी निःश्वास सोडला. सोमवारी पहाटेपासूनच त्यांनी मंदिराच्या दारात पूजासाहित्य घेऊन ठाण मांडले. सोमवार असल्याने कपिलेश्वर मंदिरात गर्दी होणार, हा अंदाज असल्याने ते फूल, उदबत्ती, कापूर, हार, श्रीफळ, बेलपत्र, दुर्वा असे साहित्य घेऊन मंदिराच्या आवारात दाखल झाले. अर्थातच त्यांचा अंदाज खरा ठरला. दोन महिन्यांपासून कपिलेश्वर मंदिराला न आलेल्या भाविकांनी सोमवारी सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लावली. मंदिरात जाण्यापूर्वी या छोटय़ा विपेत्यांकडून त्यांनी पूजासाहित्य खरेदी केले. त्यामुळे बऱयाच दिवसांनंतर या विपेत्यांच्या हातात चार पैसे खेळले. त्यामुळे कपिलेश्वराने आता कोरोनाला पूर्ण हद्दपार करावे, असे गाऱहाणे त्यांनी घातले.









