युवा शेतकरी गौतम कामत यांनी माळरानावर फुलविली होती बाग, वितरण व विक्रीअभावी फुले फुकट जाऊ नयेत यासाठी परिसरात घरपोच वाटप
वार्ताहर / खोल
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात झोकून देऊन प्रगतशील शेतकरी म्हणून सर्वपरिचित झालेले आगस-खोल येथील युवा शेतकरी गौतम गोविंद कामत यांनी कष्टाने फुलविलेली ऑर्किडची फुलशेती सध्या लॉकडाऊनमुळे विक्री करता येत नसल्याने संकटात सापडली आहे. मात्र खचून न जाता त्यांनी खोल परिसरातील नागरिकांना ही फुले घरपोच वितरणाचा सपाटा लावला आहे.
श्री. कामत यांनी आपल्या भूभागात ओसाड माळरानावर ऑर्किड फुलशेती करण्याचा निर्धार केला आणि सुमारे एक किलोमीटर अंतरावर विहीर खोदून पाण्याचा साठा उपलब्ध केला. फुलांच्या उत्पादनासाठी आवश्यक साधनसुविधा निर्माण केल्या. फुलशेतीसाठी आवश्यक ज्ञान वेळोवेळी कृषी क्षेत्रातील तज्ञ अधिकारी वर्गाकडून संपादित करून फुलशेतीला प्रारंभ केला. फुलशेती बहरली आणि हळूहळू फुलांची विक्री सुरू झाली. मुंबई, पुणेसारख्या शहरांत फुलांची निर्यात होऊ लागली. काणकोण तालुक्मयातील ऑर्किडची फुलशेती करणाऱया अन्य शेतकऱयांप्रमाणे कर्जाचा बोजा व शासनाचे सवलतीच्या बाबतीत वेळकाढू धोरण या कात्रीत अडकूनही फुलशेतीकडे पाठ न फिरवता गौतम व त्यांची पत्नी प्रज्ञा कामत यांनी यंदाच्या हंमामात दुप्पट जोमाने या व्यवसायात स्वतःला झोकून घेतले.
कोरोना अवतरला व व्यवसाय धोक्यात आला
संपूर्ण बाग बहरली, त्यामुळे चेहऱयावर नवचैतन्य आले. मात्र ऐनवेळी कोरोना अवतरला अन् सर्व व्यवसायच धोक्मयात आला. एकवेळ मागणी होती, पण तितक्या प्रमाणात फुले उपलब्ध नव्हती. सध्या फुले मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत, पण बाहेरगावची परिस्थिती प्रतिकूल आहे. सध्या विक्रीस योग्य व परगावी पाठविण्यासाठी तयार असलेल्या फुलांचे ढीग बनले आहेत. लाखो रुपये किमतीची ही फुले कोमेजण्याचा धोका निर्माण झाला आहे. श्रमाने फुलविलेली बाग वितरण व विक्रीविना वाया जात आहे. मात्र अशा परिस्थितीतही आपला धीर खचू न देता आणि ही फुले कोमेजू न देता कामत दांपत्याने ती खोल परिसरातील नागरिकांना घरपोच वितरणाचा सपाटा चालविला आहे.
कृषी खात्याने साहाय्य करण्याची मागणी कामत दांपत्याने या अभिनव प्रयत्नातून फुलशेतीवर ओढवलेल्या संकटाची तीव्रता काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याकडून दिली जाणारी फुले स्वीकारताना नागरिकही हेलावून गेल्याशिवाय राहत नाहीत. कृषीमंत्री व कृषी खात्याने यासंदर्भात विशेष लक्ष देण्याची व या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने फुलशेती करणाऱया शेतकऱयांना सरकार पातळीवरून साहाय्य करण्याची गरज व्यक्त होत आहे. कृषीक्षेत्रात अनेक साधनसुविधा निर्माण केल्या आणि अनेक सवलती जाहीर केल्या, तरी शेतकऱयांना जर अशावेळी आधार मिळत नसेल, तर आधीच कृषी व्यवसायाकडे पाठ फिरविलेला आजचा युवावर्ग या क्षेत्रात पुढे येण्याचा विचार करणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे.









