ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गोल्डन गर्ल हिमा दास हिची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्रा दास यांनी 5 जून रोजी पत्राद्वारे क्रीडा मंत्रालयाकडे ही शिफारस केली आहे.
दुलाल चंद्रा दास यांनी हिमासह अन्य खेळाडूंचीही या पुरस्कारासाठी शिफारस केली केली आहे.त्यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचा समावेश आहे.
वीस वर्षीय हिमा दासने 2018 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर तिने जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत सुवर्ण आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2018 मध्ये तिला अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.









