उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी घेतले काम करवून
प्रतिनिधी / सातारा
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही भाग हा सातारा पालिकेत आलेला आहे. या भागातली स्वच्छता करण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आरोग्य विभागास सुचना देवून तब्बल २० डंपर कचरा उचलण्यात आला. खासदार उदयनराजे यांच्या सुचनेनुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ही मोहिम राबवण्यात आली.
खासदार उदयनराजे यांच्या सुचनेनुसार सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात पायाभुत सुविधा देण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पुढाकार घेवून सातारा पालिकेने हालचाली सुरु केल्या. पिरवाडीसह खेड ग्रामपंचायतीतील दोन वॉर्डातील साडे पाच हजार लोकसंख्या शहरात आली आहे. या भागात घंटागाडीचे सातत्य नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी वीस सफाई कर्मचारी, दोन डंपर लावून पिरवाडी, सदर बाजार, म्हाडा कॉलनी, मानस प्राईड हॉटेलची समोरची बाजू ते वेण्णा नदीपर्यंतचा भाग स्वच्छ करण्यात आला. पालिकेची मोहिम सुरुच असून या मोहिमेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः लक्ष देवून काम करवून घेतले. लवकरच या भागात घंटागाड्या सुरु करणार आहेत. तसेच अन्य सुविधा देण्यासाठी आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांच्याशी चर्चा करुन नियोजन करण्यात येणार असल्याचेही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले.