प्रतिनिधी/ खेड
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगर परिषदेने मास्क न वापरणाऱया 9जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रूपये याप्रमाणे 4 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. वारंवार सूचना देऊनही बाजारपेठेत मास्क न घालता फिरणाऱया नागरिकांवर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. मिठाई दुकानातील कर्मचारी व शहरात मास्क न घालता फिरणाऱया 9 जणांवर ही कारवाई करण्यात आली. या भरारी पथकात प्रमुख मनोज शिरगावकर, सहाय्यक वसुली लिपिक परशुराम पाथरे, उमा गुजराथी, स्मिता गुहागरकर, सुनील खातू यांचा समावेश होता.









