बेंगळूर : कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत असून लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाचा विळखा बसला आहे. चामराजनगरचे खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचे स्वीय साहाय्यक शंकर यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते.
मागील 40 वर्षांपासून ते श्रीनिवास प्रसाद यांचे खासगी स्वीय साहाय्यक म्हणून काम करत होते. आठवडाभरापूर्वी शंकर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना बेंगळूरमधील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे निधन झाले होते.









