भात मळण्या संपवून वीट मजूर लागले कामाला, प्लास्टिक गवताच्या सहाय्याने मजुरांनी तयार केल्या झोपडय़ा

आप्पाजी पाटील /नंदगड
खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातून गेल्या पंधरा दिवसांपासून वीट उत्पादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या वीट उत्पादनाच्या कामाला जोर आला असून वीट उत्पादकांसह कामगार फडावर दिसून येत आहेत. वर्षभराच्या गुजराणसाठी कामगार धडपडत असून हजारो कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.
माती चांगली असल्याने विटांनाही मागणी
खानापूर तालुक्मयाच्या गर्लगुंजी, निट्टर, गणेबैल, गंगवाळी, सावरगाळी, गुंजी, किरावळे, कामतगा, माणिकवाडी, भालके, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, शिवोली, हलगा, तोपिनकट्टी, बरगाव, गर्बेनहट्टी, बस्तवाड आदी भागातील माती विटासाठी उत्तम असल्याने या भागात सुगीनंतर तीन-चार महिने विटांचे उत्पादन घेतले जाते. हिवाळा सुरू झाला की वीट व्यवसायाला सुरुवात होते. वीट व्यवसाय हा आर्थिक उत्पन्नाचा भाग मानला जातो. वीट व्यवसायात सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा बनला आहे. या व्यवसायासाठी विविध भागातून तसेच हल्याळ, धारवाड, गोकाक, यमकनमर्डी आदी ठिकाणाहून हजारो कामगार दरवषी खानापूर तालुक्मयात येतात. येथे तळ ठोकून वीट उत्पादकाकडे विटा मारण्याचे काम करतात. या व्यवसायावरच वर्षभराची रोजीरोटी कमवतात.
विटांना गोवा, धारवाड, हुबळी, बैलहोंगल व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठी मागणी
तालुक्मयातील वीट व्यवसायाला आता जोमाने सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून काही व्यावसायिकांनी विटासाठी आवश्यक असणाऱया मातीचा पुरेपूर साठा केला आहे. विटा तयार करण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. खानापूर तालुक्मयातील वीट चांगली असल्याने या विटांना गोवा, धारवाड, हुबळी, बैलहोंगल व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही बऱयापैकी मिळतो. सध्या साडेपाच रुपये एका विटेला आहे. सध्या वीट मारण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी भट्टी बांधून विटा भाजणे या प्रक्रियेला सुमारे महिना लागणार आहे.
मळणीची कामे अंतिम टप्प्यात
खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात हे येथील प्रमुख पीक आहे. तालुक्मयातील कापोली, हलगा, हलशी, बिडी, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, लालवाडी, चापगाव, गर्लगुंजी, जांबोटी, कणकुंबी, नंदगड, गोधोळी तसेच अन्य भागात भाताचे पीक घेण्यात येते.
यावषी पाऊस बऱयापैकी पडल्याने पीक जोमाने आले होते. पण ऐन कापणीच्या हंगामात पाऊस झाल्याने बहुतांशी जमिनीतील भातपीक कुजून गेले होते. डिसेंबर महिन्यात पावसात भिजलेल्या भाताची मळणी करण्यात आली. तर जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात उर्वरित भाताची मळणी करण्यात आली. सध्या मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
ऊस उत्पादक द्विधा मनस्थितीत
गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातील ऊस तोडणीची कामे सुरू झाली आहेत. कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजेच माळरानावरील ऊस तोडणी मोठय़ा प्रमाणात झाली असून पाणथळ जमिनीतील पाणी जसजसे कमी होते. त्याचप्रमाणे शेतात ट्रक जाण्यासाठी वाट करण्यात येते. त्यानंतर पाणथळ जमिनीत ऊस तोडणीला सुरुवात होते. यावषी उशिरा पाऊस झाल्याने पाणथळ जमिनीत काही प्रमाणात अद्यापही पाणी साचल्यामुळे पाणथळ जमिनीतील ऊस तोडणी थोडी कठीण बनली आहे.
कोरोनामुळे मजुरांना कामाचा अभाव
कोरोनामुळे काम नसल्याने यावषी साधरणतः पाच-सहा महिने गोरगरीब मजूर कामगारांना कामे मिळाली नाहीत. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीत त्यांना दिवस काढावे लागले. केव्हा एकदा सुगी होते व त्यानंतर वीट व्यवसाय सुरू होतो, याची चिंता कामगारांना लागली होती. बहुतेक कामगार गेल्या महिन्याभरापासून आपापल्या साहित्यासह विटा मारण्याच्या तळावर जाऊन पोचले आहेत. मध्यंतरी आकाशात अचानकपणे ढग दाटून येत असल्याने पाऊस पडण्याची शक्मयता निर्माण झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस पूर्णतः गेल्याने वीट उत्पादनाच्या कामाला मात्र जोरात सुरुवात झाली आहे.









