तत्कालीन आरोग्य अधिकाऱयांचे दुर्लक्ष, जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर तालुक्मयामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. तत्कालीन आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनी तालुक्मयामध्ये अनेक डॉक्टर हे बोगस असून ते सेवा बजावत आहेत, अशी कबुली दिली होती. मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
खानापूर तालुक्मयात दुर्गम गावे अधिक आहेत. याचाच फायदा घेत अनेक बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक आहे. अनेकांवर योग्य ते उपचार मिळत नसल्याचे प्रकार सामोरे आले आहेत. अनेकांचा बळीही गेला आहे. त्यामुळे विनोद नाईक यांनी तक्रार केली होती. त्यामुळे एका डॉक्टराने धमकी दिली होती. त्यानंतर जाणूनबुजून तक्रारदाराच्या पत्नीवर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.
या घटनेनंतर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद देण्यात आली. त्यानंतर लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या ठिकाणी खटलाही सुरू आहे. मात्र तत्कालीन आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ हे अशा डॉक्टरांना पाठिशी घालत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी विनोद नाईक, गोविंद किरमटे, महेश तोरगल यांच्यासह वकील उपस्थित होते.









