इकोफ्रेंडली, नॉन टॉक्सिक पेंटः गडकरी यांच्या हस्ते सादरीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या पेंटचे सादरीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. या इकोप्रेंडली, नॉन टॉक्सिक पेंटचे ‘खादी प्राकृतिक पेंट’नावानिशी सादरीकरण केले आहे, अशी माहिती खादी इंडियाने ट्वीट करुन दिली आहे.
गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या पेंटची विक्री ही खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. सदरचा रंग हा इकोप्रेंडली, नॉन टॉक्सिकच्या व्यतिरिक्त ऍण्टी बॅक्टेरिया, ऍण्टी फंगल आणि वॉशेबलही राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सदरच्या सादरीकरणावेळी खादी आणि ग्रामोद्योगाने दावा केला आहे, की हा रंग वासरहित म्हणजे शेणाचा कोणताही गंध नसून भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केला आहे. यात डिस्टेंपर पेंट आणि इमल्शन पेंटही सादर करण्यात आला आहे.
नुकसान न होण्याचा दावा
यावेळी करण्यात आलेल्या दाव्यानुसार शेणापासून बनविण्यात आलेल्या या रंगामध्ये कोणतेही हानिकारक धातू नाहीत. याचे रीतसर परिक्षण नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई आणि गाझियाबाद तसेच श्रीराम इन्स्टिय़ूटय़ूट फॉर इंडस्ट्रीयल रिचर्स, नवी दिल्ली या देशातील तीन मोठय़ा प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे.









