वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
लास व्हेगास येथे शनिवारी झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध संघटनेच्या वेल्टरवेट गटातील जेतेपदाच्या लढतीमध्ये अमेरिकेच्या टेरेन्स क्राफर्डने चौथ्या फेरीत इंग्लंडच्या केल ब्रुकचा पराभव केला.
लास व्हेगासच्या एमजीएम ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आयोजिलेल्या या मुष्टीयुद्ध लढतीत क्रॉफर्डने आपल्या जबदरस्त ठोशावर ब्रुकला रक्तबंबाळ केले. 2020 सालातील ही पहिली मुष्टीयुद्ध लढत आयोजित केली होती. क्रॉफर्डच्या ठोशाने चौथ्या फेरीत ब्रुकला जमिनीवर लोंळण घ्यावी लागली. पंचांनी ही चौथी फेरी 1 मिनिट 14 सेकंद कालावधीनंतर थांबवीत क्रॉफर्डला विजयी म्हणून घोषित केले. कोरोना महामारी समस्येमुळे यालढतीसाठी केवळ 100 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. क्रॉफर्डने आपल्या वैयक्तिक मुष्टीयुद्ध कारकीर्दीत 37 लढती जिंकल्या असून अद्याप एकही लढत गमविलेली नाही. वेल्टरवेट गटात आता क्रॉफर्डने पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखले आहे.









