क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगांव नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर क्रीडाभारती बेळगाव यांच्यावतीने आयोजित क्रीडाभारती क्रीडामहोत्सवाला शनिवारी 11 रोजी सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, लेकव्हय़ूचे संचालक डॉ. गिरीश सोनवलकर, मल्लीकार्जुन जगजंपी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य शारीरिक प्रमुख नागेश रेड्डी, क्रीडा भारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा संयोजक विश्वास पवार उपस्थित राहणार आहेत.
या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात प्रामुख्याने भारतीय खेळाचा समावेश असणार आहे. यात महिलासाठी तसेच शालेय प्राथमिक व माध्यमिक मुली गजगे हा खेळ, प्राथमिक व माध्यमिक मुलांसाठी खुला गट भोगरा, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुली पोत्यात पाय घालून पळणे, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुली तीन पायांची शर्यत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी शाळेच्या मैदानावर रविवारी 12 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
तसेच खुला गट व माध्यमिक मुले व मुली कब्बडी व थ्रोबॉल व माध्यमिक मुलें व मुलींसाठी खो-खो, व्हॉलीबाल, थ्रोबॉल तसेच व्हॉलीबॉल प्राथमिक मुला-मुलींसाठी ही स्पर्धा जिल्हा क्रीडांगणावर शनिवारी 11 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.









