मुंबई
मागील चोवीस तासांमध्ये क्रिप्टो करन्सांच्या (आभासी चलन) किमती 17 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय करन्सी बिटकॉईनच्या किमतीत यावेळी 10.19 टक्क्यांनी घसरण राहिली आहे. याचे भाव आता 47,222 डॉलरपर्यत पोहोचले आहेत. मागील आठवडय़ात ही करन्सी 51 हजार डॉलरपेक्षा अधिकच्या मूल्यावर कार्यरत राहिली होती.
क्रिप्टोसोबत अन्य करन्सीमध्ये मोठी घसरण पहावयास मिळाली होती, बिनांस कॉईनच्या किमती 15.82 टक्क्यांनी घसरुन 422 डॉलरवर राहिली आहे. एथरियमच्या किमती 10.42 टक्क्यांनी घसरल्या असून ही करन्सी 3,522 डॉलरवर कार्यरत राहिली आहे. कार्डानो 2.53 डॉलरवर असल्याने यांची किमत 10.63 टक्क्यांनी घसरली आहे. एक्सआरपीची किमत मागील 24 तासात 16.89 टक्क्यांनी घसरली आहे. साधारणपणे अल सल्वाडोरने पहिल्यांदाच 200 बिटकॉईनची खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे.









