कंपनी कायदा 2013 नूसार बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॉर्पोरेट मंत्रालयाने पारदर्शकेतेला चालना देण्यासाठी कंपनी कायदा 2013 मध्ये बदल केला आहे. या बदलानुसार कंपन्यांना क्रिप्टोकरंसीमधील गुंतवणूक संदर्भातील माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. यासोबत कंपन्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर), बेनामी प्रॉपर्टीची माहिती देणे अनिवार्य होणार असून याबाबतचा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या कंपनी कायद्यामध्ये ऑडिट, ऑडिटर आणि खात्यांशी संबंधीत काही नियमांध्ये बदल करण्यात आला आहे. मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे कंपन्यांना अशा फर्मसंबंधाची माहिती द्यावी लागणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार जर काही कंपन्या क्रिप्टोकंरसीमधील व्यापार करत असतील तर त्यांना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. तसेच क्रिप्टोकरंसीमधील गुंतवणूक, कमाई आणि अन्य विषयांची माहिती देणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे.









