बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत राज्य सरकारवर टीका होत आहे. राज्यसरकार कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यास कमी पडत असल्याचे विरोधी पक्षकडून म्हंटले जात आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. मंत्री सुधाकर यांनी यांनी टीका करणाऱ्यांना राज्यातील सर्व आर्थिक कामे होऊ दिल्यानंतर घटनांमध्ये वाढ होणे ही काय जादू आहे? असं म्हंटले आहे. यावेळी मंत्री सुधाकर पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. यावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत आहे. दरम्यान राज्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी वॉर रूमची स्थापना केली आहे. २४ तास हे वॉर रूम कार्यरत असणार आहे. त्यामुळॆ एकूणच परिस्थितीवर लक्ष राहील.









