प्रतिनिधी / कुरुंदवाड
स्वच्छ सर्वेक्षण 2020 या अभियानांतर्गत कुरुंदवाड पालिकेचा पश्चिम भारतात 36 वा तर राज्यात 27 वा क्रमांक आला आहे. महापुरानंतर पालिका प्रशासन,कर्मचारी लोकप्रतिनिधी आणि स्वच्छतेच्या कंपनीने केलेल्या कामाला यश आल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्षा मुमताज बागवान,मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या 25 अधिकाऱ्यांच्या केंद्रीय समितीने शहरात सर्व्हे करून केंद्रीय नगरविकास विभागाकडे अहवाल सादर केला होता. (ओ.डी.एफ)व (ओ.डी.एफ प्लस-प्लस)च्या तपासणीत पालिकेने सर्व निकष पूर्ण केल्याने हागणदारी मुक्त शहर म्हणून सर्वोच्च राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.
माहिती देताना मुख्याधिकारी जाधव पुढे म्हणाले शहरात घरोघरी फिरून कचरा उठाव करून ओला – सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे.कचरा डेपोत घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखले आहे.पालिकेने स्वच्छतेबाबत केलेल्या नियोजनाचे समितीने सर्व्हेक्षण करत नियोजनाचे कौतुक केले होते.
नगराध्यक्ष बागवान म्हणाल्या कुरुंदवाड शहर हे निमशहरी असल्याने सभोवताली असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातून शेणमिश्रित निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यासाठी पालिकेतर्फे मार्गदर्शन करून सेंद्रिय शेतीला बळ दिले यातून स्वच्छ भारत अभियाना बरोबरच सेंद्रिय शेतीचा ही उपक्रम सफल झाला. पालिका प्रशासन, कर्मचारी सफाई कंपनी यांच्या चांगल्या कामाला लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या प्रेरणेने आणि नगरसेवकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशात राज्यात पालिकेचे नाव लौकिक झाल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक रामचंद्र डांगे,नगरसेविका आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









