कोल्हापूर / प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आरक्षणाची आकडेवारी, आरक्षण काढण्यासाठी ठिकाण व इतर सूचना कायम ठेवून तालुकानिहाय संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात येवून आरक्षण सोडत बुधवारी 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निश्चित करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले.