प्रतिनिधी/शिरोळ
येथील नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष पै. प्रकाश गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या आहे. येत्या गुरुवारी, (दि.29) दुपारी बारा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील गटाचे कट्टर समर्थक नगरसेवक राजेंद्र माने यांची निवड निश्चित मानली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही निवड होणार आहे. ही विशेष सभा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात दुपारी 12:30 वाजता ही सभा होणार असून नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरोळ नगरपरिषदेमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी -काँग्रेस ,स्वाभिमानी संघटनेची सत्ता आहे. विद्यमान नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मावळते उपनगराध्यक्ष गावडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, या रिक्त पदावर राजेंद्र माने यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Previous Articleकोलंबियात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा
Next Article सोलापूर : पंढरीत नियंत्रित कोरोनाचा पुन्हा शिरकाव









