प्रतिनिधी / कोल्हापूर
वयाच्या दहाव्या वर्षांपासून वडिलांच्या वृत्तपत्र व्यवसायात घरोघरी वर्तमान पत्र पोहोच करत ऋषिकेश शिवाजीराव आगलावे याने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्याने वडिलांच्या कामामध्ये अखंडपणे मदत करीत देवचंद महाविद्यालय, निपाणी येथून M.Sc ( ऍग्रोकेमिकल & पेस्ट मॅनेजमेंट) परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी गुण मिळवत यश संपादन केले. या कामगिरीबद्दल कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर व अध्यक्ष रवि लाड यांच्या हस्ते ऋषिकेशचा करण्यात आला.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रणजित आयरेकर, सचिव अमर जाधव, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगुले व शाहु ट्रस्ट चे अध्यक्ष किरण मंगुरे, तसेच इंद्रजित पोवार, शिवाजीराव आगलावे, समीर कवठेकर, सुरेश कदम(सर), अमित कारंडे, सौरभ लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ऋषिकेश याने SSC परीक्षेत महाराष्ट्र हायस्कुल मधून व HSC परीक्षा प्रायव्हेट हायस्कुल ज्युनियर कॉलेजमधून तर B.Sc परीक्षा गोपालकृष्ण गोखले कॉलेज येथून प्रथम श्रेणी गुण मिळवत पूर्ण केली. त्याला पंडित मॅडम, एम एम ऐतवडेकर, शिरगावे सर व देवचंद महाविद्यालयाचे प्राचार्य पी डी खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









