प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह परिसरामध्येेेे पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सुमारे पाऊण तास ही रिमझिम सुरुच होती. कोल्हापूर आणि परिसरात सकाळी काहीसं ढगाळ वातावरण दुपारी उन्हाची सौम्य तिरीप आणि सायंकाळी पावसाची रिमझिम यामुळे कोल्हापुरकरांना एकाच ऋतुमध्ये वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव येत आहे.
सायंकाळचा लागणाऱ्या संतधार पावसाने शहर आणि परिसरात वाहतुकीस काहीसा अडथळा निर्माण झाला होता. यामुळे शहरात अनेक ठीकाणी वाहने थांबल्याचे चित्र ही पाहायला मिळत आहे.