वार्ताहर/गोकुळ शिरगाव
रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. यातच विमानसेवेलाही परवानगी मिळाल्याने विमान सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांचा ओघ वाढला आहे. तब्बल चौदा दिवसांनी कोल्हापूर हैदराबाद या एकाच विमानातून आज 69 प्रवासी केला आहे.
20 मार्च पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साठ दिवस विमानसेवा लॉकडाउनमुळे खंडीत होती. लॉकडाउन उठल्यानंतर कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 14 दिवसापासून अगदी सुरळीतपणे चालू आहे. पंचवीस तारखेला सुरू झालेली विमानसेवा थोड्या व कमी प्रमाणात येणाऱ्या प्रवासावर चालू झाली. रविवार 7 जून रोजी पूर्वीप्रमाणेच वर्दळ आज विमानतळावर पाहायला मिळाली. कोल्हापूर .हैदराबाद विमानातून तब्बल 69 प्रवासी आज गेले यामुळे बर्याच दिवसांनी पूर्ण विमान भरून गेले असल्याचे विमान प्रधिकरण चे संचालक कमल कुमार कटारिया यांनी सांगितले.
कोल्हापूर, बंगळूरु, हैदराबाद, तिरुपती विमानसेवा पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेप्रमाणे सेवा सुरू आहे. त्याचबरोबर दिवसभरात आठ विमानाचे लँडिंग व टेक ऑफ होत आहे, यामध्ये विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढत असून लवकरच सर्व विमाने आजच्या प्रमाणेच दर दिवशी पूर्ण भरून जातील. आज दिवसभरात कोल्हापूरमध्ये एकूण 54 प्रवासी आले तर 135 प्रवासी गेले. दिवसभरात आज विमान सेवेचा 189 प्रवाशांनी लाभ घेतला तर कोल्हापूर ,तिरुपती साठी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कमल कुमार कटारिया यांनी सांगितले.
प्रवासी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत असून प्रत्येक प्रवाशाचे स्क्रीनिंग करूनच आत सोडले जाते. शासनाने कोरोना संदर्भात जी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत त्या आदेशाचे पालन करूनच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना विमान सेवेचा लाभ दिला जात आहे.
Previous Articleबंदी असतानाही पन्हाळ्यावर पर्यटकांची घुसखोरी
Next Article सांगली : आटपाडीत ५० वर्षावरील नागरिकांचे घेतले स्वॅब








